
Pune Crime । पुणे : देशात अजूनही गुन्हेगारीला (Crime) आळा बसला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वीपेक्षा कायदे कडक केले आहेत. तरीही दररोज कित्येक गुन्हे घडत असतात. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही, असा आरोप सतत केला जातो. लहान लहान गोष्टींवरून गुन्हे घडल्याचे आपण ऐकत असतो, पाहत असतो. सध्या असाच एक गुन्हा शारीरिक संबंधास नकार दिल्याने घडला आहे. (Crime News)
Libya । भीषण दुर्घटना! स्थलांतरितांना नेणारं जहाज बुडालं, 61 जणांचा मृत्यू
ही धक्कादायक घटना पुणे शहरात (Pune Crime News) घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. शहरातील बिबबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शत्रुंज मंदिर चौक ते गंगाधाम चौक या मार्गावरील एका गार्डनजवळ असणाऱ्या पालामध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी बिबवेवाडी (Bibwewadi) पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यांना या महिलेने शरीर संबंधास विरोध केल्याने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
Covid19 Sub Variant । कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाचं वाढलं टेन्शन! दोघांचा मृत्यू
माहितीनुसार दोघे आरोपी दारू पिऊन पालामध्ये झोपण्यासाठी आले. तेव्हा संबंधित महिलाही तिथेच होती. दारुच्या नशेत दोघांनी महिलेवर जबरदस्ती केली. त्यावेळी या महिलेने त्यांना विरोध केला. याच रागात आरोपीने थेट महिलेच्या डोक्यात रॉड घातला, गंभीर जखमी झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. महिलेची ओळख पटली नसून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Kamalnath । मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना मोठा फटका! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन डच्चू