
Rohit Patil । सांगली : टेंभू सिंचन योजनेमध्ये (Tembu Irrigation Scheme) तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील एकूण १७ गावांचा समावेश करावा, या मागणीसाठी आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील (Suman Patil) आणि त्यांचा मुलगा रोहित पाटील यांनी आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरु केले आहे. परंतु रोहित पाटील यांची तब्येत ताप आल्याने बिघडली आहे. त्यामुळे तातडीने उपोषणस्थळी डॉक्टरांचं एक पथक दाखल झाले आहे. (Latest Marathi News)
DGCA Rule । काय सांगता! भारतीय वैमानिकांना परफ्यूम वापरता येणार नाही? जाणून घ्या नेमकं कारण
रोहित पाटील यांना 102 डिग्री ताप आहे. त्यामुळे सध्या ते उपोषणस्थळी झोपून आहेत. दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आंदोलनस्थळी जाऊन सुमनताईंची त्यांनी भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. उपोषणापूर्वी टेंभू विस्तारित योजनेसाठी 8 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यास शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे.
Havaman Andaj । सावधान! राज्यातील 15 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट; उद्या कशी असेल पावसाची स्थिती?
परंतु जोपर्यंत या योजनेच्या अहवालाला तृतीय सुधारित मान्यता मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका सुमनताईंनी घेतली आहे. भाजपाचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी या उपोषण स्थळी जात उपोषणाला जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.