Rohit Pawar । सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्येच आता पहिल्या दिवसापासून वादात सापडलेल्या तलाठी भरतीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागच्या आठवड्यात तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये काही विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण मिळाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
तलाठी भरती वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली होती. आर्थिक घोटाळ्याचा संशय देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रोहित पवार यांनी एका जागेसाठी 25 लाख रुपयांची वसुली झाली असल्याचे धक्कादायक आरोप देखील केले होते. आता या प्रकरणात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडी घेतली आहे.
Shah Rukhkhan । शाहरुख खानने कुटुंबाच्या सर्वात वाईट काळाबद्दल केले मोठे वक्तव्य!
आमदार रोहित पवार यांच्या आरोपानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. त्याचबरोबर रोहित पवार यांनी केलेले सर्व आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.
तलाठी भरती संदर्भात खोटे प्रचार करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. याशिवाय जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहे त्यांच्यावर अन्याय का करायचा? असा सवाल उपस्थित केला आहे.