Rohit Pawar । अमोल मिटकरी यांनी काढली रोहित पवारांची लायकी, म्हणाले; “तुझी खरी लायकी केवळ…”

Rohit Pawar

Rohit Pawar । अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत गेल्याने हा गट सतत शरद पवार गटावर टीका करताना पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांच्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्याला आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची थेट लायकीच काढली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Pune Crime । धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने केला खून

ada

Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंतसाठी धक्कादायक बातमी समोर

“श्रीनिवास काका आणि सामान्य जनतेची भूमिका सारखेच आहे. आपल्या काकाला सोडून जाणे हे बरोबर नाही, असे सगळ्यांना वाटते. पवार साहेबांच्याच विचाराने चालणारे कुटुंब असल्याने आम्ही पवार साहेबांसोबत आहोत. पण अजित पवारांनी निर्णय घेत स्वतःला कुटुंबापासून दूर केले आहे. ज्यांनी श्रीनिवास काका यांच्या विरोधात विधान केले आहे त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे, हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे मी मिटकरींवर बोलून वेळ वाया घालवणार नाही, ” असे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Lok Sabha Elections 2024 । लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींना सर्वात मोठा धक्का!

रोहित पवारांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. अमोल मिटकरी यांनी याबाबत ट्विट करत असे म्हटले आहे की, “तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहेस दादा कष्ट करून इथपर्यंत आले आहेत. ते तुला कराव लागल नाही, शेतकरी पुत्र म्हणून मरेपर्यंत आम्ही दादा सोबत आहोत. जोपर्यंत जयंत पाटील साहेब सोबत आहे, तोपर्यंत तू जबाबदारीचे पत्र घे कारण तुझी लायकी फक्त त्यांनाच माहिती आहे. बालबुद्धी हीच तुझी लायकी आहे,” अशी जहरी टीका मिटकरी यांनी केली आहे.

Spread the love