Rohit Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड लोकसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्याकडून बुथ ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यामुळे बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी याबाबत ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे.
Pune News । पुण्यात भरदिवसा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक प्रकार; सोन्याच्या दुकानावर दरोडा
व्हिडीओ शेअर रोहित पवार यांनी लिहिले की, “बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजाताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल”.
Navi Mumbai । नववी नापास तरुणाने युट्युबवर पाहून छापल्या नकली नोटा; पोलिसांना समजताच…
महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूक_आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया! असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
Manoj Jarange । ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरु
बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा #परळी_पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. #पंकजा_ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे #बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 19, 2024
महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून?… pic.twitter.com/Q54UdsZI34