Rohit Pawar । राजकारणातून मोठी बातमी! रोहित पवारांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ

rohit pawar

Rohit Pawar । पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या गाडीचे मालक सत्ताधारी आमदार शहाजीबापू पाटील आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी स्पष्ट प्रश्न उपस्थित केला आहे की, “या ५ कोटी रुपयांची रक्कम शहाजी बापूंनी स्वीकारली का?” त्यांनी पुढे याबाबतच्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांची नाव असल्याचेही सांगितले.

Baba Siddiqui murder case । बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पुण्यातून आणखी तिघांना अटक; धक्कादायक माहिती समोर

रोहित पवार यांनी वधारलेल्या आरोपांमध्ये सांगितले की, “या घटनेत सहा ते सात गाड्या सहभागी होत्या आणि त्यात २५ ते ३० कोटी रुपयांची रक्कम होती.” त्यांनी असा दावा केला की, भाजप, अजित पवार यांचा पक्ष आणि महायुती एकत्र येऊन एका मतदारसंघात ३० ते ४० कोटी रुपये खर्च करण्याचा विचार करत आहेत. पवार यांनी जनतेवर महायुतीचा विश्वास राहिलेला नाही, असे सांगताना हे देखील म्हटले की, “पैसा ओतून स्वाभिमानी लोकांना विकत घेता येत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले की निष्ठा आणि विचार हे महत्त्वाचे आहेत.”

Uddhav Thackeray | ब्रेकिंग! ठाकरे गटाची विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर; शिंदे गटाला थेट आव्हान

या प्रकरणात रोहित पवार यांनी केलेले आरोप राज्याच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे. शहाजीबापू पाटील आणि त्यांच्या पक्षाने या आरोपांची तीव्रपणे निंदा करणे अपेक्षित आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar । ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदाराने केला अजित पवार गटात प्रवेश

Spread the love