शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गोंधळ सुरू आहे. यामुळे पक्षातील नेते व कार्यकर्ते तणावात आहेत. अशातच शरद पवार यांचे पुतणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) एका अडचणीत सापडले आहेत. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याला ४.५० लाखांचा दंड बसला आहे. भाजपचे आमदार राम शिंदे ( Ram Shinde) यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
गांजाच्या नियंत्रित शेतीसाठी प्रयत्न सुरू; ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय…
साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करण्याबाबत सरकारने तारीख निश्चित केली होती. मात्र रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याने ( Baramati Agro Sugar Industry) त्या तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केला. या प्रकरणी आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. प्रशासनाच्या तपासानंतर या साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Sharad Pawar । सर्वात मोठी बातमी! शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला
बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी रोहित पवारांना क्लीनचिट मिळाली असून अजय देशमुख या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.