Site icon e लोकहित | Marathi News

Rohit Pawar । रोहित पवार यांना मोठा धक्का! कट्टर समर्थक राम शिंदेंकडे जाणार?

Rohit Pawar

Rohit Pawar । मागच्या वर्षभरात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकानंतर Gram Panchayat Elections() कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Karjat-Jamkhed MLA Rohit Pawar) यांना अनेक राजकीय धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, कट्टर समर्थक, पदाधिकारी हे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासोबत जात असल्याचे दिसत आहे. आता पुन्हा एकदा रोहित पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याची माहिती मिळत आहे. मिरजगाव गटाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले आणि रोहित पवारांचे कट्टर समर्थक समजले जाणारे परमवीर पांडुळे आता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. (Paramveer Pandule on the way to BJP)

Shrigonda News । संभाजी ब्रिगेडच्या ठिय्या आंदोलनाच्या इशारा नंतर रस्त्याचे रखडलेले काम सुरू

रोहित पवार यांना ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अनेक धक्के बसू लागल्याने कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकारण चांगले चर्चेत आले आहे. रोहित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र असे असले तरी त्यांच्या हातून स्थानिक समीकरण सुटत असल्याचे चित्र दिसत आहे. रोहित पवार यांचे अत्यंत जवळचे परमवीर पांडुळे यांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतली त्यामुळे आता ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Car Accident । धक्कादायक! जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव कारने तिघांना चिरडले, एक जण गंभीर जखमी

परमवीर पांडुळे मिरजगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी राम शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पांडुळे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित पवारांसाठी हा धक्का मानला जात आहे.

Pune Accident । ताबा सुटल्याने भरधाव टेम्पोनं अनेकांना चिरडलं, सात जण गंभीर जखमी

Spread the love
Exit mobile version