Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सध्या अडचणीत आले आहेत. रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर आज ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीच्या पथकाने ६ ठिकाणी छापेमारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. पुणे बारामती आणि इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
याआधी बारामती ॲग्रो कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण विभागाने नोटीस दिली होती. यावेळी ७२ तासात प्लांट बंद करण्याच्या सूचना या नोटीसमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी स्वतः ट्विट करत मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाकडून त्यांनी स्थगिती मिळवली होती.
Amol Kolhe । “…त्यावेळी अमोल कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते” अजित पवार गटाच्या नेत्याची टीका
दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर अजित पवारांकडे जवळपास 40 पेक्षा जास्त आमदार गेले. त्यानंतर शरद पवारांकडे मोजकेच आमदार शिल्लक राहिले. यावेळी शरद पवार यांची बाजू भक्कमपणे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी संभाळली. मात्र आता रोहित पवार पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.