Site icon e लोकहित | Marathi News

Rohit Pawar । “बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून…”, रोहित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Rohit Pawar

Rohit Pawar । मुंबई – मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार शरद पवारांवर निशाणा साधला होता. “आगामी निवडणुकीत शरद पवार यांचा पराभव हेच लक्ष्य आहे. त्यांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार आहे, ” चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडुन प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Breaking । एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका

रोहित पवार म्हणाले की,”जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असले तरी शरद पवार हेच आमचं श्रद्धास्थान असल्याचं अजित पवार सांगतात. पण शरद पवारांवर थेट टीका अजित पवार गट करत नाही. भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोबत असतानाही शरद पवारांना टार्गेट केलं जात, ” असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.

Lok Sabha Election । शिंदे गटाच्या तीन विद्यमान खासदारांना डच्चू? जाहीर झाली १४ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं

“वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपची निती सगळ्यांना माहिती आहे. पवार साहेबांचा पराभव करणं हे कपटी भाजपचं लक्ष्य आहे, असे चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे. त्यासाठी बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून चालवली जात आहे. साहेबांच्या पराभवासाठी आपला वापर होऊ द्यायचा की नाही हे अजित पवारांनी ठरवावे, ” असा सल्लाही रोहित पवारांनी दिला आहे.

Rohit Sharma । चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! रोहित शर्माबाबत मोठी माहिती समोर

Spread the love
Exit mobile version