Site icon e लोकहित | Marathi News

Rohit Pawar । “संपूर्ण महाराष्ट्र भिकारी होईल पण…” रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य

Rohit Pawar

Rohit Pawar । अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण सावंत कधीच भिकारी होणार नाहीत अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांच्यावर केली आहे. रुग्ण मृतांबाबत मला काहीही विचारू नका असं आरोग्य मंत्री म्हणतायेत मग याबाबत जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.

Lawrence Bishnoi । मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गॅगच्या टार्गेटवर अजून एक पंजाबी सिंगर; दिली जीवे मारण्याची धमकी

त्याचबरोबर अजित पवार यांना मुख्यमंत्री करू असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर देखील रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, पुन्हा मुख्यमंत्री करू असेच ते म्हणणार, आता मुख्यमंत्री करू, न्याय मिळवून देऊ, त्याचबरोबर आत्ताच मृत रुग्णांना मदत करू असं फडणवीस कधीच म्हणणार नाहीत. कायमच पुन्हा करू असं त्यांचं म्हणणं असतं. यापूर्वी देखील त्यांनी पुन्हा शब्दावर जोर दिला होता. असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.

Soil testing । भारीच की! पोस्टाने परीक्षणासाठी पाठवता येणार माती, आठवड्यात मिळेल अहवाल

त्याचबरोबर अजित दादांच्या सभेत यशवंतराव चव्हाण यांचे फोटो लावण्यात आले. याबाबत देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित दादांच्या सभेत यशवंतराव चव्हाण साहेबांचे फोटो दिसत आहेत. त्याच चव्हाण साहेबांना पवार साहेबानी गुरू मानलं. त्यांच्या प्रेरणेने पवार साहेब राजकारण करतात आता पवार साहेबांचा फोटो वापरता येईना म्हणून ते चव्हाण साहेबांचा फोटो वापरतात त्यामुळे आता चुकीच्या पद्धतीने काम केले तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या फोटो समोर बसून केले तरी चालेल. असे देखील रोहित पवार म्हणाले आहेत.

Animal Care । ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा जनावरांच्या आजारापासून मुक्तता, जाणून घ्या सविस्तर

Spread the love
Exit mobile version