
सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांची घुसमट होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याविषयी त्यांनी उघडपणे बोलून दाखवले आहे. यावरुन भाजपवर निशाणा साधत पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सल्ला दिला आहे.
महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, “शरद पवार म्हणजे अंगठा…”
रोहित पवार म्हणाले की, आपलं मत जनतेसमोर ठेवून जनतेसाठी लढलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी पंकजा मुंडे यांना दिला. तसेच, लोकनेते भाजपामध्ये गेल्यानंतर शांत का होतात, शांत होतात की, त्यांचा आवाज दाबला जातो? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवीचा वाढदिवस; पाहा खास फोटो!
दरम्यान, “सध्यातरी आपल्याला राजकारणात काहीही मिळण्याची लालसा उरलेली नाही. समाजातील अखेरच्या व्यक्तीच्या विकासासाठी काम करत राहण्याचा सल्ला मला गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्यामुळे आपली पुढील वाटचाल कायम राहणार आहे. राजकारणात काहीच राहिले नाही तर ऊस तोडायला शेतात जायची आपली तयारी आहे,” असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होत.
शेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, 70 वर्षीय आजोबांनी स्वतःच आयुष्य संपवलं