
राज मुंगासे या रॅपरने एक गाणं तयार केलं होतं. या गाण्यामध्ये ५० खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. यांनतर याची सगळीकडे जोरदार चर्चा होती. या तरुणाविरोधात अंबरनाथमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. आता यामुळे आमदार रोहित यांनी संताप व्यक्त केला आहे.
मोठी बातमी! ५० खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या तरुणाला अटक
रोहित पवार ट्विट करत म्हणाले, “आपल्या रॅपसाँग मध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला ५० खोके या शब्दामुळं अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का? शिव्याचं कुणीही समर्थन करत नाही, पण राज्यातील खुद्द एका मंत्र्यानेच महिला लोकप्रतिनिधीला अर्वाच्च शिविगाळ केली तेंव्हा कारवाई करण्याऐवजी सरकारने कानात बोटं घातली आणि डोळे बंद केले. ब्रिटीश राजवटीची आठवण करुन देणारा हा धोकादायक कारभार आहे. असं रोहित पवार म्हणाले आहेत.
“तरुणांनी बाईकवर केला जीवघेणा स्टंट अन् पुढे घडलं असं की…”, पाहा थरकाप उडवणारा Video
आव्हाडांनीही व्यक्त केला संताप –
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं.आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. असं ट्विट आव्हाडांनी केले
“तरुणांनी बाईकवर केला जीवघेणा स्टंट अन् पुढे घडलं असं की…”, पाहा थरकाप उडवणारा Video