
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar) हे कायम नवनवीन उपक्रम राबवत असतात. नुकताच त्यांनी महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘महाव्हिजन फोरम’ नावाचा उपक्रम सुरू केला आहे. सोशल मीडियावर तर ते कायम ऍक्टिव्ह असतात. आज तर त्यांनी ट्विटरवर एक नवीन ट्रेंड (Twitter Trend) सुरू केला आहे. #AskRohitPawar हा तो ट्रेंड असून यावर ते नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे भयानक नुकसान; मदतीसाठी सरकारकडे केली मोठी मागणी
विविध राजकीय विषयांपासून ते स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर विचारलेल्या प्रश्नांवर देखील रोहित पवार दिलखुलासपणे बोलत आहेत. या ट्रेंडमध्ये रोहित पवार यांना विचारण्यात आले की, भाजपमधील कोणता नेता आवडतो यावर उत्तर देत रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांचं नाव घेतलं आहे. सध्या हे चर्चेत आहे.
रोहित पवारांनी ट्विटरवर सुरु केला प्रश्न उत्तरांचा नवीन ट्रेंड; तरुणीने विचारला खासगी प्रश्न
त्याचबरोबर जर तुमचा बायोपिक करायचे ठरले, तर तुमच्या व्यक्तीरेखेसाठी तुम्ही कोणाला निवडाल ? वैभव तत्ववादी की ललित प्रभाकर? यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले आहेत की, “माझा रोल मलाच करायला आवडेल.”
गडकरी साहेब https://t.co/T7w4PFx0VB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023