मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपवर टीका करताना शरद पवार यांनी ‘ ठाण्याने आतापर्यंत सुसंस्कृत नेतृत्व दिलं आहे…ठाणेकरांनी काळजी घेतली तर महाराष्ट्रावर उपकार होतील. ‘अस वक्तव्य केलं आहे. तर दुसरीकडे, रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली आहे.
मोठी बातमी! अधिवेशनादरम्यान मंत्रालयाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा हजर होते.ही भेट जवळपास १० ते १५ मिनिटांची झाली.यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भेट घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे भाजपाच्या मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपानंतर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
Thackeray-Fadanvis: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण
भेटीत ‘या’ विषयांवर केली चर्चा
रोहित पवारांनी मुख्यमंत्र्याच्या भेटीत केलेल्या चर्चेबद्दल माहिती दिली आहे. विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. तो म्हणजे युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहे. त्या भारतात कशा आणाव्या, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसंच पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.