Rohit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे सध्या अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण त्यांच्यावर ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. बारामती अॅग्रो’ कंपनीशी (Baramati Agro Company) संबंधित 50 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यावरून पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी कारवाईवरून ईडीवर टीका केली आहे. (Latest marathi news)
ईडीच्या कारवाईनंतर आज रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी बोलताना ईडीवर निशाणा साधला. “कन्नड कारखान्यावर जप्तीची नोटीस अजून पोहोचली नाही. या कंपनीचं युनिट कन्नड छत्रपती संभाजीनगरमध्ये जो कारखाना असून त्याच्यावर एक सिम्बॉलिक जप्तीचे आदेश ईडीकडून काढले आहेत,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
Politics News । राजकीय वर्तुळात मोठा भूकंप! काँग्रेसच्या ३२ नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
पुढे ते म्हणाले की,”मला 8 मार्च 2024 ला नोटीस आली. प्रेसनोटच्या माध्यमातून आम्हाला समजले. पण ही प्रेसनोटच चुकीची असल्याचे आमच्या लक्षात आलं. यामध्ये एकतर माझ्याआधी ज्या कारखान्याला प्रेसनोट आली होती, अगदी तशीच कॉपी मला दिसली. जरंडेश्वर साखर कारखान्याला पाठवलेली प्रेसनोट आणि आम्हाला पाठवलेली प्रेसनोट ही जवळपास एकसारखीच आहे. कॉपी पेस्ट करताना ईडीकडून घाईगडबडीने खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत”, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jayant Patil । “…त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही” जयंत पाटील यांचे सर्वात मोठे वक्तव्य