Rohit Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी तलाठी भरती परीक्षा चांगलीच चर्चेत आली होत. तलाठी भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याची टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली होती. या टीकेनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.
अहमदनगर या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले “तुम्ही जर एखाद वक्तव्य करत असाल तर त्याबाबत जाहीरपणे त्याचे पुरावे देखील मांडा, आम्ही महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु केलेली आहे. त्यामुळे पुरावे द्या अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा असा थेट इशारा विखे पाटील यांनी दिला आहे.
Nilesh Rane । निलेश राणे यांना मोठा धक्का! पुण्यातील डेक्कन परिसरातील मालमत्ता सील
त्याचबरोबर विखे पाटील म्हणाले, पूर्वी आजोबा विधान करायचे आता नातवान परंपरा पुढे नेण्याचे ठरवले आहे. असं म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे.
Politics News । मोठी बातमी! भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित