Site icon e लोकहित | Marathi News

बागेश्वर बाबांच्या संत तुकाराम महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Rohit Pawar Reacts to Bageshwar Baba's Offensive Statement About Sant Tukaram Maharaj; said…

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची असे वक्तव्य बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बागेश्वर बाबा यांच्या या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. यामध्येच आता त्यांच्या या विधानावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अन्नू कपूर यांच्या प्रकृतीबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट!

रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत.. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही.”

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

नेमके कोण आहेत बागेश्वर बाबा?

बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) हे छतरपूर (Chhatrapur) जिल्ह्यातील आहेत. येथील बागेश्वर धाम हनुमान या मंदिराचे पुजारी व कथावाचक म्हणून त्यांना ओळखले जात होते. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shatri) हे त्यांचे मूळ नाव आहे. छतरपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला असून त्यांचे बालपण प्रचंड गरिबीत गेले होते. बागेश्वर बाबांचे 12 वी पर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु, त्या पुढील शिक्षणासाठी बाबांना वृंदावन येथे पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे एक हजार रुपये न्हवते. म्हणून बागेश्वर बाबांनी शिक्षण सोडून वडिलांसोबत कथा वाचण्यास सुरुवात केली.

संत तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना रोज मारायची, बागेश्वर बाबांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

Spread the love
Exit mobile version