Site icon e लोकहित | Marathi News

Rohit Pawar | रोहित पवार यांनी दिली ईडीच्या समन्सवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “24 नको, 22 जानेवारीला”

Rohti Pawar

Rohit Pawar | रोहित पवार यांना ईडीचं (ED) समन्स बजावण्यात आले आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ईडीने बारामती अ‍ॅग्रो कंपनी प्रकरणी चौकशीचं समन्स बजावलंअसून रोहित पवार यांनी येत्या बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. दरम्यान आता ईडीच्या या समन्सवर रोहित पवार यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ayodhya Ram Mandir । राज्य सरकारचा मोठा निर्णय! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर

“ईडीच्या बातमीमुळं राज्यातून अनेकांनी फोन, मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो, परंतु काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील”.

Sharad Pawar । रोहित पवारांना ईडीची नोटीस येताच शरद पवार यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले; ‘राज्यात लवकरच ईडी..

“ED ला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल”. असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Kishori Pednekar । बिग ब्रेकिंग! किशोरी पेडणेकर यांनाही ईडीचं समन्स, नेमकं कारण काय?

Spread the love
Exit mobile version