Rohit Pawar । राष्ट्रवादी संघर्षावर रोहित पवारांचं मोठे विधान; म्हणाले…

Rohit Pawar

Rohit Pawar । मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांची संघर्ष यात्रा सुरू आहे. नुकतीच यात्रा अमरावती जिल्ह्यात दाखल झाली आहे. युवकांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी रोहित पवार हे या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यांच्या यात्रेला नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News)

Cyclone Michong । चारचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या, विमानतळावर पाणीच पाणी, पाऊस इतका की चेन्नई शहराचा समुद्र झाला; धक्कादायक व्हिडीओ आले समोर

दरम्यान, अमरावती (Amravati) जिल्ह्यामध्ये यात्रेदरम्यान रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. रोहित पवार म्हणाले, जे प्रश्न संघर्ष यात्रा घेऊन अधिवेशनावर जात आहे ते प्रश्न सुटले नाही तर याचे रूपांतर आंदोलनात करण्यात येईल. असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

Cyclone Michong । चारचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या, विमानतळावर पाणीच पाणी, पाऊस इतका की चेन्नई शहराचा समुद्र झाला; धक्कादायक व्हिडीओ आले समोर

त्याचबरोबर यावेळी बोलताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “निवडणूक येवू दया, मग घड्याळ कोणाकडे राहिलं हे समजेल. निवडणूक आयोगाला एकतर्फी निर्णय देता येणार नाही, आता फक्त अजित पवार मित्र मंडळ आहे,” असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला आहे.

Maratha Reservation । मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं अशक्य! भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Spread the love