Rohit Pawar । सध्या अनेक बडे नेते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर आणखी काही नेते संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केले आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “जे लोक त्यांच्या विचारांना बांधील नाहीत. ते भाजपसोबत जातील ज्यांनी चुका केल्या ते भाजपसोबत जातील” असं रोहित पवार म्हणाले आहेत.
पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आदिवासी बांधव उपोषणाला बसले त्यांना भेट देण्यासाठी आमदार रोहित पवार हे आले होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. रोहित पवार म्हणाले, जे दोन गट भाजपासोबत गेले आहेत. त्यांना विधानसभेला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवाव्या लागतील असं रोहित पवार म्हणाले आहेत.
Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांनी अजित पवरांचा ‘तो’ व्हिडीओ केला सोशल मीडियावर व्हायरल
त्याचबरोबर पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, स्वाभिमानी मराठी माणसं अजून देखील भाजप सोडून इतर पक्षात आहेत. भाजपचा आणि स्वभिमांनाचा दूर दूर पर्यंत संबंध येत नाही. आज शरद पवार साहेबांसोबत जे लोक आहेत. ते कोणीही भाजपमध्ये जाणार नाहीत याचे आश्वासन देतो. असं देखील रोहित पवार म्हटले आहेत.
Manoj Jarange Health । चिंताजनक बातमी! मनोज जरांगेंच्या पोटात तीव्र वेदना, प्रकृती आणखी खालावली