Rohit Pawar । मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यानंतर शरद पवार गटाला चांगलीच गळती लागली. अनेक नेत्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटातील आणखी एक खासदार अजित पवार गटाला समर्थन देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावरूनच रोहित पवार यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या काही नेत्यांना ब्लॅकमेल केले जाते. समर्थनार्थ सही करा नाहीतर तुमची कामे होणार नाहीत. असं सांगून अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असावा असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
त्याचबरोबर रोहित पवार पुढे म्हणाले, “राज्यातील सत्ताधाऱ्यांना दिल्लीमधून मार्गदर्शन केले जाते. विधानसभा अध्यक्षांना देखील केंद्रातील नेते आता मार्गदर्शन करायला लागलेत. त्यांनी सांगितलं की काही लोकांना अपात्र करायचा आह. मग ते निवडणूक आयोगात जातील आणि निवडणूक आयोग देखील भाजपाच्या हातातली बाहुली आहे”. असं रोहित पवार म्हणाले आहेत.