Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांनी अजित पवरांचा ‘तो’ व्हिडीओ केला सोशल मीडियावर व्हायरल

ROhit Pawar And Ajit Pawar

Rohit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन्ही गट पडले. हे दोन्ही गट एकमेकांवर टीका करतच आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांचे काका शरद पवार यांना पडण्याची भाषा केली होती. अजित पवार यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

Manoj Jarange Health । चिंताजनक बातमी! मनोज जरांगेंच्या पोटात तीव्र वेदना, प्रकृती आणखी खालावली

दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी एक जुना व्हिडिओ ट्विट करत अजित पवार यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. एकेकाळी अजित पवार यांना आपल्या काकांचा अभिमान होता. तेच अजित दादा आता काकांना पाडण्याची भाषा करत आहेत. हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी त्यांच्या माध्यमातून केला आहे.

Nitish Kumar Threat । “भाजपपासून वेगळं व्हा अन्यथा बॉम्बनं उडवून देऊ” बड्या नेत्याला धमकी

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “मा. अजित #काका तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्यापलिकडचा आहे. जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेतंय, हे दुर्दैवि आणि हो! जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर #का अन्याय केला जातो? या #का? चं उत्तरही त्यांना विचारलं तर बरं होईल! असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Praful Patel । राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक असताना प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी का? बड्या नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

Spread the love