Rohit Pawar । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) आमदार रोहित पवार हे सध्या अडचणीत आले आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी (Baramati Agro Company) निगडित ठिकाणांवर ईडीने धाड टाकली आहे. कारवाई ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग (Money laundering) प्रकरणात करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण विभागाने यापूर्वी बारामती अॅग्रो कंपनीला नोटीस दिली होती. कारवाईनंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
Ajit Pawar । महायुतीत पडणार दरार? विदर्भात अजित पवार गटाची भाजपच्या 3 जागांवर नजर
“आम्ही कारवाईवेळी ईडी (ED) आणि सीबीआयला (CBI) सहकार्य केलं आहे. काहीजण सुडाचं राजकारण करत असून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हातोडा घेऊन गेलेल्यांचा काय झालं, फडणवीसांनी एकतर गृहमंत्रीपद ठेवावं किंवा उपमुख्यमंत्रीपद ठेवावं. त्यांनी एकातरी पदाला न्याय द्यावा. नाहीतर त्यांनी गृहमंत्रीदाचा राजीनामा देऊन टाकावा,” अशी आक्रमक मागणी रोहित पवारांनी केली आहे.
Mahadev Betting App । मोठी बातमी! महादेव बेटिंग अॅपसंबंधी मुंबई क्राईम ब्रँचकडून पहिली अटक
भाजप आमदारांकडून पोलिसांना मारहाण झाली. कांबळे हे भाजपचे आमदार असून आता त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. अजित दादा त्यावेळी व्यासपीठावरच उपस्थित होते. मग, दादा गप्प का राहिले, असा सवाल रोहित पवारांनी पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित केला आहे. दरम्यान, आता अजित पवार (Ajit Pawar vs Rohit Pawar) कशाप्रकारे उत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल.