Rohit pawar । लोकसभेला सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी अजित दादांना कोणाचा दबाव? रोहित पवारांचे ट्विट चर्चेत

Rohit Pawar

Rohit pawar । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही चूक असल्याचं विधान मंगळवारी केलं. सध्या या विधानाची चर्चा सगळीकडे होत आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Microsoft Paint 3D । मायक्रोसॉफ्टचा धक्कादायक निर्णय, या दिवसापासून पेंट 3D ॲप बंद होणार

रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिले की, “खा. सुप्रियाताईंच्या विरोधात सुनेत्रा काकींना उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असूच शकत नाही अशी खात्री होती. ती चूक होती म्हणून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्याची तुम्ही कबुली दिली, परंतु तुमचे मित्रपक्ष मात्र उलट प्रचार करत हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगतात. याला तुम्ही ‘चूक झाल्याचे नाव देत असलात’ तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला ‘असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर असल्याची’ चर्चा आहे”.

Ajit Pawar । “…मला त्या चुकीचा खूप पच्छाताप होतो”, अजित पवारांनी सर्वांसमोरच बोलून दाखवली चूक

“दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान, विचारधारा आणि साहेबांना सोडून तुम्ही भाजपचं मांडलिकत्व स्वीकारलं आणि यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला, याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक पुतण्या म्हणून कायम दुःख राहील. पण ही कटकारस्थाने करणाऱ्या तसंच महाराष्ट्र नासवणाऱ्या कलाकाराला मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्याच्या राजकीय पटलावरून एक दिवस नक्की बाजूला सारेल, हा माझा तुम्हाला पक्का वादा आहे”. असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Ajit Pawar । लोकसभेला सुप्रियांविरुद्ध सुनेत्रांना उभं करायला नको होतं, अजित दादांनी बोलून दाखवली खंत

Spread the love