Rohit Pawar । अजित पवार गटाबाबत रोहित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Rohit Pawar

Rohit Pawar । लाँड्रिंग प्रकरणात १८ महिने तुरुंगवास भोगलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) गटात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. या पत्र व्यवहाराच्या वादात आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतलीय.

Video । व्यक्तीने आधी एटीएम मशीन फोडले, नंतर पैशांऐवजी काढली ही वस्तू, व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल

महायुतीत मलिक यांनी प्रवेश केल्यानंतर रोहित पवार यांनी भाजप आणि अजित पवार गटावर जोरदार टीका केलीय. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होते आणि नवाब मलिक हे भाजपा विरोधात बोलत होते. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी त्यांना देशद्रोही आणि बरंच काही बोलले. या दरम्यान त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि अनेक अडचणी सोसाव्या लागल्या.” असं रोहित पवार म्हणाले आहेत. ते वर्ध्यातील संघर्ष यात्रेतील सभेत बोलत होते. (Latest News)

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिले पत्र – ‘नवाब मलिक यांना युतीत घेणे योग्य नाही’

त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, “बऱ्याच वर्षांनी नवाब मलिक हे अधिवेशनात आले. त्यावेळी भाजपच्या एकही व्यक्तीने त्याच्याबाबतीत कोणी काही बोललं नाही. पण जेव्हा त्यांच्यावर टीका सुरू झाली मग कुठे जाऊन हे सर्व जागे झाले. मग खोटे आरोप केले असले तर मग आता लोक बोलत आहेत म्हणून त्यांनी एक साधं पत्र काढलं. ते पत्र मित्र मंडळाला दिलं, यामुळे यातून एक कळतंय की मित्र मंडळाकडे स्वायतता राहिलेली नाहीये. अशा शब्दात रोहित पवार यांनी टीका केली आहे.

Aditya Thackeray । बिग ब्रेकिंग! आदित्य ठाकरे यांनी गाठली दुबई, एसआयटी चौकशीची भीती?

Spread the love