
Rohit Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar group) आणि अजित पवार गट (Ajit Pawar group) असे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गट एकमेकांवर टीका करत आहेत. सध्या शरद पवार गटातील नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. शरद पवार साहेबांनी अजित दादांवर मुलासारखं प्रेम केलं. त्यांच्यावर अन्याय झाला अस आम्हाला कोणालाच वाटत नाही. मात्र त्यांनीच कुटुंबाला एकटे पाडले आहे असा मोठा आरोप रोहित पवार यांनी अजित पवारांवर केला आहे.
Rajendra Patni Passed Away । राजकीय वर्तुळातून दुर्देवी बातमी! भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन
अहमदनगर या ठिकाणी बोलताना रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी त्या ठिकाणच्या जनतेला भावनिक आवाहन केले होते. बारामतीमध्ये मला एकटं पाडल जातंय. असे विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्याच विधानाचा रोहित पवार यांनी समाचार घेत अजित पवार यांना प्रत्युत्तर दिल आहे.
त्याचबरोबर योगेंद्र पवार यांनी घेतलेली भूमिका देखील योग्य आहे. त्यांनी शरद पवार साहेबांच्या बाजूने भूमिका घेतली कारण. आम्हाला सर्वांना माहीत आहे अजित दादांवर साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं. जी जी मोठी संधी समोर आली ती कुटुंबातील इतर कोणालाही मिळाली नाही तर अजितदादांना मिळाली त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असं आम्हाला कोणालाच वाटत नाही. उलट अजित पवार यांनी कुटुंबाला एकट पाडलं असा मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
Beed News । धक्कादायक बातमी! शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न