अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर केले. औरंगाबादचे छ. संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले. अशातच पुन्हा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली.
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील जान्हवीचा वाढदिवस; पाहा खास फोटो!
गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर चर्चा होत होती. या पार्श्वभूमीवर चौंडी ( ता. जामखेड जि. अहमदनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली.
रोहित पवार यांनी पंकजा मुंडेंना दिला मोठा सल्ला; म्हणाले, “जनतेसमोर या आणि…”
एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा केली. यावर राष्ट्रवादीचे युवा नेते कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, जिल्ह्याच्या नामांतराचे श्रेय कोणी एका पक्षाने घेऊ नये. कोणी एका व्यक्तीने घेऊ नये. या नामांतराचे श्रेय जनतेचे असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले.
महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली; म्हणाले, “शरद पवार म्हणजे अंगठा…”
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे नाव आहिल्यानगर करणार असल्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता काम केले. त्यांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिले तर; मी त्याचे स्वागत करतो, असे ते म्हटले.
शेजाऱ्याने केलेला अपमान जिव्हारी लागला, 70 वर्षीय आजोबांनी स्वतःच आयुष्य संपवलं