“लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा”, मोदींच्या कार्यक्रमावर रोहित पवारांची जहरी टीका

Rohit Pawar's venomous criticism of Modi's program "Was it a program of public offering or a ceremony of appreciation for each other".

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) काल मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते मुंबईमधील विकास कामांचे लोकार्पण आणि त्याचबरोबर काही कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आता या कार्यक्रमावरुन आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी निशाणा साधलाय. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केले आहेत.

इंस्टाग्राम रिल्स बनविणे तरुणाला पडले चांगलेच महागात; थेट पोलिसांनी केली अटक

रोहित पवार यांनी याबाबत ट्विट केले आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!”

सरकारी बंगल्यावर येऊन अमृता फडणवीसांसोबत नाचणारा रियाज अली नक्की आहे तरी कोण? वाचा सविस्तर

त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, “मात्र, २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!” असे ट्विट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

पट्ठ्याने मैदान गाजवलं! विसापूरमध्ये अनुभवी पैलवानांना लोळवत सिकंदरने जिंकलं ५ लाखांचं बक्षीस

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *