Site icon e लोकहित | Marathi News

रोहित पवारांचा विरोधकांना दिला इशारा; म्हणाले,”…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही”

Rohit Pawar's warning to opponents; Said, "...the sun will not rise because the chickens are covered"

राज्यातील राजकीय वातावरण चांगलीच उलथापालथ चालू आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे वाद चालू असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची विरोधक एकही संधी सोडत नाहीयेत. यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट देखील केले आहे.

अरे बापरे! चक्क बस स्थानकातून एसटी बस गेली चोरीला; वाचा सविस्तर

रोहित पवारांनी (Rohit Pawar) ट्विट करत लिहिले की, “राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून युवांमध्ये वाढणारा तीव्र असंतोष आणि #BharatJodo यात्रेला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळं धडकी भरल्याने मीडियाचं लक्ष हटवण्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याची चर्चा आहे. पण लक्षात ठेवा…कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा रहात नाही”!

ब्रेकिंग! सुपरस्टार महेश बाबूच्या वडिलांचे निधन

दरम्यान, रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या अटकेचा निषेध देखील व्यक्त केला होता. त्याचबरोबर राऊतांच्या कारवाईबाबत देखील रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं होत. यासंदर्भात त्यांनी ट्विट देखील केले आहेत.

महत्वाची बातमी! शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये; वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version