Rohit Pawar । रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांचा लाठीचार्ज, कार्यकर्ते आक्रमक

Rohit Pawar

Rohit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढली आहे. 24 ऑक्टोबरला संघर्ष यात्रा पुण्यात सुरु झाली होती. युवा यात्रेने (Yuva Sangharsh Yatra) आतापर्यंत 10 जिल्हे, 30 तालुके आणि सुमारे 800 किलोमीटरचे अंतर पार केले आहे. तरुणांचे विविध मुद्दे घेऊन निघालेल्या युवा संघर्ष यात्रेचा आज समारोप होत आहे. परंतु याला गालबोट लागले आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange । मराठा समाज सरकारला पायाखाली तुडवू शकतो, मनोज जरांगेंचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर रोहित पवार यांची ही यात्रा म्हणजे राज्याच्या राजकारणात एका प्रकारे रोहित पवार यांचे नव्याने लौंचिंग मानले जात आहे. विधानसभेवर (Vidhansabha) धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले अडवून त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतरमुळे पक्षाचे युवक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून जाण्याचा प्रयत्न केला.

Accident News । भीषण अपघात! ट्रॅक्टर पलटी झाल्याने 9 मजुर गंभीर जखमी

राज्य सरकारकडे (State Govt) रोहित पवारांनी काही मागण्या केल्या. परंतु या मागण्या स्वीकारण्यासाठी सरकारचे जबाबदार व्यक्ती हजर राहिले नाही. त्यामुळे रोहित पवारांसह कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कोणी जबाबदार व्यक्ती निवेदन स्वीकारण्यास येणार नसल्यास आम्ही विधानभवनात जाऊन निवेदन देऊ, असं पवार म्हणाले होते. कार्यकर्त्यांनी विधानभवानकडे कूच करताच पोलिसांनी लाठीचार्ज करत रोहित पवारांना ताब्यात घेतले.

Rajinikanth Birthday । बस कंडक्टर ते तामिळनाडूचा थलायवा, रजनीकांतच्या संपत्तीचा आकडा पाहून तुमचेही फिरतील डोळे

Spread the love