Site icon e लोकहित | Marathi News

Rohit Sharma : रोहित शर्माने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचाही मोडला विक्रम, भारतासाठी इतिहास रचला

Rohit Sharma also broke the record of Pakistan's Shahid Afridi, creating history for India

मुंबई : चौथ्या T20 मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 59 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर ३-१ अशी आघाडी घेतली. अशा प्रकारे भारताने टी-20 मालिका जिंकली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. चौथ्या T20 मध्ये आवेश खानला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला होता. अवेशने 4 षटकांत 17 धावांत 2 बळी घेण्यात यश मिळविले, याशिवाय अर्शदीपने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीने अप्रतिम खेळ दाखवत 3 बळी घेत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना अडचणीत आणले. भारताच्या विजयात गोलंदाजांनी कमाल केली, तर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांनी उपयुक्त खेळी खेळून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

या सगळ्याशिवाय भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 16 चेंडूत 33 धावा करत चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. रोहितने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. यादरम्यान रोहितने एक अप्रतिम विक्रम आपल्या नावावर केला. हिट मॅनने सिक्स मारण्यात पाकिस्तानी दिग्गज शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) मागे टाकले आहे.

आफ्रिदीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 476 षटकार मारले आहेत. त्याचबरोबर रोहितच्या नावावर ४७७ आंतरराष्ट्रीय षटकार नोंदवले गेले आहेत.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 हजार धावा पूर्ण करण्यातही रोहित यशस्वी ठरला आहे. रोहितच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी 16,000 धावा पूर्ण केल्या होत्या.

Spread the love
Exit mobile version