आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमला कसलीच तोड नाही! या संघाने अनेकदा आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) हा ‘मुंबई इंडियन्स’ टीमचा एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याने आयपीएलच्या इतिहासत तब्बल ५ वेळा मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) ट्रॉफी मिळवून दिली आहे. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एवढा यशस्वी खेळाडू कधी काळी डिप्रेशन मध्ये गेला होता.
Big Breaking | शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका! प्रश्न पुन्हा उपस्थित
रोहित शर्माच्या आयुष्यातील त्या फेजबद्दल एका महिला खेळाडूने खुलासा केला आहे. २०११ च्या वर्ल्ड कप मध्ये संघामध्ये रोहित शर्माची निवड झाली न्हवती. यावेळी १९८३ नंतर भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. यामुळे भारतात सगळीकडे आनंदी आनंद होता. मात्र आपली संघात निवड न झाल्याने रोहित यावेळी प्रचंड दुःखी झाला होता. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात महिला खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने याबाबत खुलासा केला आहे. ( Rohit Sharma in depression)
जवळपास १० वर्षांनी भारतीय क्रिकेट संघाचे ( Indian Cricket team) कर्णधारपद तुझ्याकडे आहे. परंतु, त्यावेळी तुला माहिती होते का असे काही होईल ? असा प्रश्न रोहित शर्माला कार्यक्रमादरम्यान विचारण्यात आला. यावेळी रोहितने आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवल्या.” २०११ च्या वर्ल्ड कप संघात निवड न झाल्यानंतर अनेक लोक मला भेटून गेले होते. मात्र युवराज सिंह असा होता. ज्यांने मला सोबत जेवायला न्हेले. सुमारे एक महिनाभर मी त्यावेळी डिप्रेशन मध्ये होतो. असे रोहित शर्मा म्हणाला. महत्त्वाची बाब म्हणजे कधीकाळी संघात स्थान न मिळालेला रोहित शर्मा २०२३ मध्ये भारताला ICC ची ट्रॉफी मिळवून देऊ शकतो.
“उद्धव ठाकरेंना ती चूक भोवली…” पाहा नेमकं काय म्हंटल आहे सुप्रीम कोर्टाने