
देशात सध्या आयपीएलचे ( IPL) वारे वाहत आहे. आयपीएल ही सर्व क्रिकेट प्रेमींसाठी मेजवानी असते. त्यातल्या त्यात यंदाचा आयपीएल सिझन विविध कारणांनी गाजत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या कालच्या सामन्यात रोहित शर्माने सर्वांनाच धक्का दिला आहे.
ब्रेकिंग! शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, 9 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी
रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे त्यामुळे तो ओपनिंगला येतो. पण काल सीएसके विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी आला. त्यामुळे अनेक तर्कवितर्क देखील लावले गेले. रोहित शर्मा तिसऱ्या नंबरवर बॅटिंगसाठी आल्याने सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. तो ओपनिंगला का आला नाही? हाच प्रश्न सर्वांना पडला होता.
आता याबाबत रोहित शर्माने माहिती दिली आहे. याबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “जे आम्हाला योग्य वाटत ते आम्ही करतो. तिलक वर्मा खेळत नव्हता. मधल्या ओव्हर्समध्ये भारतीय फलंदाजांनी बॅटिंग करावी अशी आमची रणनिती होती ” असं रोहित शर्मा म्हणाला आहे. सध्या त्याच्या वक्तव्याच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहेत.
Google Update । तुम्हीही सर्च करण्यासाठी गुगलचा वापर करता का? समोर आली मोठी अपडेट; एकदा वाचाच