
Rohit Sharma । लवकरच आयपीएलला सुरुवात होणार आहे. आगामी होणाऱ्या आयपीएलकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेले आहे. लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल दुबईमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सच्या टीमची चर्चा होत आहे. याला कारणही तसेच आहे. कारण मुंबई टीमने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई टीमचा कर्णधार करण्यात आला आहे.
Maharashtra Politics । बड्या आमदाराचे उद्धव ठाकरेंबाबत धक्कादायक वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ
संघाच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण पसरले आहे.पण सध्या रोहित शर्मा संघात खेळणार नसल्याची चर्चा सुरू आहे. कारण सरावादरम्यान रोहीत शर्मा प्रॅक्टिस करताना दिसत नाही. नुकताच मुंबई इंडियन्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा कुठेच दिसत नाही. त्यामुळे रोहित शर्मा आगामी सामने खेळणार की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे.
रोहित विश्वचषक खेळला होता. त्यानंतर तो इंग्लंडविरोधात कसोटी सामने खेळला होता. तो आता आयपीएल खेळण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झाला असला तरी त्याला मागील दोन महिन्यांपासून कसलाही आराम नसल्याने आरामासाठी मॅनेजमेंटने वेळ दिला होता. दरम्यान रोहित शर्मा आगामी सामने खेळणार की नाही हे आता लवकरच स्पष्ट होईल.