Romantic Viral video | अन् त्यांनी बुलेट वरच सुरू केला रोमान्स! व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घडवली अद्दल

Romantic Viral video | And they started romance on the bullet! After the video went viral, the police made an argument

सध्या लोकांना सोशल मीडियाचे (Social Media) अक्षरशः वेड लागले आहे. याठिकाणी फेमस होण्यासाठी लोक अगदी काहीही करायला तयार होतात. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी स्टंटबाजी करण्याचे प्रमाण आजकाल वाढले आहे. मात्र फेमस होण्याच्या नादात खूपदा लोकांचा जीव धोक्यात येतो. सध्या ट्विटरवर (Twitter) एका व्हिडीओची जबरदस्त चर्चा सुरू असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दिल्लीत धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलीवर आधी चाकूने वार, नंतर दगडाने ठेचले अन्… घटना वाचून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण रस्त्यावरुन भरधाव बुलेट (Bullet) चालवत आहे. यावेळी त्याने प्रेयसीला बुलेटच्या टाकीवर बसवले आहे. त्याची प्रेयसी अक्षरक्ष: त्याच्या मांडीवर बसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत असून त्या तरुणाने उजव्या हाताने प्रेयसीची मांडी पकडली आहे. तर, डाव्या हाताने त्याने बुलेटचे हँडल पकडले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दोघांनीही हेल्मेट घातलेले नाही.

मलायकाने अर्जुनचा सेमी न्यूड फोटो केला व्हायरल; नेटकरी भडकले! म्हणाले, “तुझ्या मुलाच्या…”

ममता त्रिपाठी या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘नवाबांचं शहर लखनऊ.. अलीगंजच्या शेजारी निराला नगर पुल.. जवानीची नशा आणि बुलेट.. हे कसलं प्रेम आहे ज्यासाठी लोक जीव धोक्यात घालायला तयार आहेत’ असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडिओ फक्त ५ सेकंदांचा असून या व्हिडीओला २७,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

बिग ब्रेकिंग! मुंबईमध्ये आमदाराच्या घरात २५ लाखांची चोरी

अनेक नेटकऱ्यांनी या तरुण-तरुणीवर टिका केली आहे. ‘रील बनवण्याचा आजार वाढला आहे. त्यामुळे लोक काहीही करत असतात’, ‘प्रेमापुढे पोलीस काहीच नाही’ अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओला दिल्या आहेत. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लखनौ पोलीसांनी त्या प्रेयसी आणि प्रियकरावर कारवाई केली आहे.

कांद्याला बाजार नसल्यामुळे शेतकरी चिंतेत! खर्च केलेले पैसे निघत नसल्याने शेतकऱ्याने कांदा पेटवला

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *