फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली असून ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान आता संपूर्ण प्रकरणावर रोशनी शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत मैदानात
रोशनी शिंदे म्हणाल्या, ” गुंडगिरी करण्यासाठी ठाण्याचे मुख्यमंत्री झालात का? प्रत्येक गोष्टीचा न्याय झाला पाहिजे. दोषींनावर लवकरात लवकर कारवाई करा. फक्त माझ्यावर हल्ला झाला म्हणून मी बोलत नाही तर अनेक महिलांवर हल्ले होत आहेत. असे त्या यावेळी म्हणाल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गौतमी पाटीलचा ‘हा’ आहे आवडता क्रिकेटर; स्वतःच याबाबत केला खुलासा
त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या, तुमच्या महिला म्हणजे महिला आणि आमच्या महिल्या रस्त्यावरील आहेत का? त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी,” अशी मागणी रोशनी शिंदे यांनी केली आहे.
धक्कादायक! राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने केला हल्ला; दोनजण गंभीर जखमी