मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या अनेक दौऱ्यावर फिरताना आपल्याला दिसतात. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर होते. काल छत्रपती संभाजी नगर मध्ये त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या लवकरच साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती करण्यात येईल. त्याचबरोबर टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
रात्री 9:45 च्या सुमारास ते आले होते. प्रचंड जमलेल्या तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिंदेने गोंधळाचा कानोसा घेतला व त्यांना कळाले की पोलीस भरती रखडल्यामुळे हा गोंधळ सुरू आहे. संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळील पायऱ्या चढून जात साडे सात हजार पदांसाठी भरती करण्यात येईल. या संदर्भाने गृह विभागाच्या सचिवांसह अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात येईल, असे जाहीर केले.
पोलीस भरतीसाठी हा तरुणांचा गोंधळ पाहता शिंदे यांना पोलीस भरतीची घोषणा करावी लागली व त्यासोबतच टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.