Site icon e लोकहित | Marathi News

Rupali Chakankar । “सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या” – रुपाली चाकणकर

Rupali Chakankar On Supriya Sule

Rupali Chakankar । सध्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) होणार आहेत. मात्र या निवडणुकांची चाहूल लागताच राज्याचे राजकारण चांगले तापले आहे. अनेक राजकीय नेते एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. त्याचबरोबर बडे नेते पक्षांतर देखील करत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार गट असा (Ajit Pawar group) थेट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. (Politics News)

Cricket News । LIVE क्रिकेट सामन्यात घडली मोठी घटना, गोलंदाजी करताना हृदयविकाराचा झटका येऊन खेळाडूचा जागीच मृत्यू

दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यामध्येच आता अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुप्रियाताई गेल्या पंधरा वर्षे अजित दादांमुळेच निवडून आल्या आहेत. अशी खोचक टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे. (Politics News)

नेमकं काय म्हणाल्या रूपाली चाकणकर? (Rupali Chakankar On Ajit Pawar)

अजितदादांनी जो निर्णय घेतला आहे. तो जनतेच्या विकासासाठी घेतला आहे. अजितदादा मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम कराव लागेल. दादा मुख्यमंत्री व्हावेत हे आमचं सर्वांचं स्वप्न आहे. असे रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय होईल असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

Accident News । पिकनिकला जाणे तरुणांच्या बेतले जीवावर! कारचा भीषण अपघात, ६ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका

यावेळी बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे “अजितदादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. सुप्रियाताई गेल्या पंधरा वर्षे अजित दादांमुळेच निवडून आल्या आहेत. दादासोबत नाहीत म्हणून तळ ठोकावा लागतोय”. अशी टीका त्यांनी केली आहे

Viral Video । क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजीसाठी उतरले नेताजी, शॉट मारण्याच्या प्रयत्नात पडले तोंडावर; पाहा Video

Spread the love
Exit mobile version