क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिनची क्रिकेटप्रेमींमध्ये अजूनही तेवढीच क्रेझ आहे. आजही क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकरच (Sachin Tendulkar) नाव सहज आठवत. दरम्यान आता सचिनबाबत एक म्हत्वाची माहिती समोर आली आहे. सचिनने आज ‘बनावट जाहिराती’ संदर्भात मुंबई गुन्हे शाखा पोलिसांकडे एफआयआर दाखल केली आहे.
Bollywood | बॉलिवूड मधील सासऱ्याची आणि सुनेची ‘ही’ अधुरी प्रेम कहाणी वाचून तुम्हालाही होईल दुःख!
सचिन तेंडुलकरने लोकांची फसवणूक करण्यासाठी इंटरनेटवरील ‘बनावट जाहिराती’मध्ये त्याचे नाव, फोटो आणि आवाज वापरल्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती माहिती समोर आली आहे. सचिनच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करण्यात आल्याचे देखील या तक्रारीमध्ये म्हटले आहे. ‘sachinhealth.in’ अशी बनावट वेबसाईट त्याच्या नावाने बनविण्यात आली आहे.
या वेबसाईटमध्ये सचिनचे फोटो वापरून चुकीच्या पद्धतीने जाहिरात करण्यात येत होती. नंतर याबाबत माहिती समजताच सचिनने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माझी कोणतीच परवानगी न घेता या जाहिरातीमध्ये माझा आवाज देखील वापरला जात आहे. असं सचिनने या जाहिरातीमध्ये म्हंटले आहे. या बाबत सचिनने एक ट्विट देखील केले आहे.