बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. दिवंगत अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक गुरु दत्त (Guru Dutt) यांची बहीण ललिता लाजमी (Lalita Lajmi) यांचे निधन झाले आहे. आज (दि.13) त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
अजित पवारांचे शिवसैनिकांना आवाहन; म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना पायउतार करणाऱ्यांचा बदला…”
आमिर खानच्या (Aamir Khan) ‘तारे जमीं पर’ या चित्रपटातही त्यांनी खास भूमिका साकारली होती. ललिता लाजमी यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात स्वत:चे नाव कमावले होते. देशातील प्रसिद्ध कलाकारांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होतो.
आदिल खानबाबत राखी सावंतने केला मोठा खुलासा म्हणाली, “गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करुन तो…”
ललिता लाजमी यांचा जन्म 1932 साली कोलकाता येथे झाला. मोठा भाऊ गुरु दत्त यांच्याप्रमाणेच त्यांचाही कल शास्त्रीय नृत्याकडे होता. दरम्यान ललिता यांच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियावर चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ललिता यांची मुलगी कल्पना लाजमी ही हिंदी चित्रपट दिग्दर्शका होती. 2018 मध्ये तिचे निधन झाले.
राष्ट्रवादीला मित्रपक्षाकडून धक्का! 91 जणांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश