Maratha Reservation । जरांगे फडणवीसांच्या बंगल्याकडे रवाना, सदावर्तेंनी केला हल्लाबोल; शरद पवारांचं नाव घेत म्हणाले…

Maratha Reservation

Maratha Reservation । मुंबई : दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Strike) मुद्दा पेटत चालला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आपला जीव घ्यायचा आहे, असा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच जरांगे फडणवीसांच्या बंगल्याकडे रवाना झाले आहेत. (Latest marathi news)

Devendra Fadnavis । “…त्यामुळे देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतायेत” जरांगेंच मोठं वक्तव्य

यावरून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना राज्याला अशांत करण्याचं काम केले जात आहे. पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून अमुकाच्या घरी जातो तमुकाच्या घरी जाऊन बघा काय होतं, मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित केलं आहे.”

Devendra Fadnavis । जरांगेंनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी कशाला…”

“रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न असून यामागे राजकीय हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अँगलने तपास झाला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नव्या आरोपामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Manoj Jarange । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे मुंबईकडे फडणवीसांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना

Spread the love