Sadhus Assaulted in West Bengal । मोठी बातमी! मुलींना रस्ता विचारला म्हणून तीन साधूंना बेदम मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Sadhus Assaulted in West Bengal

Sadhus Assaulted in West Bengal । बंगालमध्ये पालघरसारखी घटना समोर येत आहे. गुरुवारी संध्याकाळी मोठ्या जमावाने उत्तर प्रदेशातील तीन साधूंना बाल चोर समजून बेदम मारहाण केली. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण पुरुलिया जिल्ह्यातील आहे. त्याचा 30 सेकंदाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Pune Crime News । ब्रेकिंग न्यूज! पुणे हादरलं, कात्रज चौक परिसरात डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “ममता बॅनर्जींच्या मौनाची लाज वाटते! हे हिंदू संत तुमच्या ओळखीच्या पात्र नाहीत का? हा अत्याचार जबाबदारीची मागणी करतो.” या घटनेची 2020 च्या पालघर मॉब लिंचिंगशी तुलना करताना, अमित मालवीय यांनी लिहिले. (Sadhus Assaulted in West Bengal )

Breaking News । मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी आली समोर

सूत्रांच्या माहितीनुसार, हे तीनही साधू उत्तर प्रदेशातून वाहन भाड्याने घेऊन गंगासागर जत्रेला जात होते. यावेळी जत्रेचा रस्ता विचारत असताना परिसरातील काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करून वाहनाची तोडफोड केली आणि त्यांना मारहाणही केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर काशीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या लोकांची सुटका करून त्यांना सोबत पोलीस ठाण्यात नेले आहे.

Congress । मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का बसणार; मुंबईतील बडा नेता शिंदे गटात जाणार

Spread the love