सह्याद्रीपुत्राचा ट्रेक करताना 200 फूट खोल दरीत पडून मृत्यु

Sahyadriputra died after falling into a 200 feet deep gorge while trekking

काही लोकांना आयुष्यात आव्हानात्मक गोष्टी करण्यात प्रचंड आनंद वाटतो. मोठं- मोठ्या गड किल्ल्यांचे ट्रेक करणाऱ्या ट्रेकर्स ची संख्या आजकाल वाढत आहे. जीवाशी खेळून हे लोक धोकादायक किल्ले चढत असतात. जीवन मरणाचा प्रश्न असताना देखील ट्रेकर्स मागे न फिरता धोका पत्करतात. यामुळे अनेकदा त्यांना जीव देखील गमवावा लागतो. पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि मावळ तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या टेल-बेल या किल्ल्यावर नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे. या किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना एका गिर्यारोहकाचा म्हणजेच ट्रेकरचा अपघात ( Accident during treak) झाला आहे.

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याने नरेंद्र मोदींची तुलना केली रावणाशी

सोमनाथ बळीराम शिंदे असे अपघाती ट्रेकरचे नाव आहे. टेल-बेल किल्ल्यावर या ट्रेकरचा ( treaker) रोप वे तुटल्याने तो 200 फूट खाली पडला. यामुळे सोमनाथ याचा जागीच मृत्यु झाला आहे. त्याच झालं असं की, सोमनाथ हे त्यांच्या नऊ मित्रांसह ट्रेक साठी टेल-बेल किल्ल्यावर आले होते. यावेळी किल्ल्यावर रोपवे बांधण्याचे काम करत असताना अचानक रोपवे तुटला. यावेळी सोमनाथ यांना सावरायला कसलाच वेळ मिळाला नाही आणि ते 200 फूट खोल दरीत पडले.

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज

मृत सोमनाथ शिंदे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून ते शिवाजी महाराजांच्या विचारांवर जगणारे होते. अतिशय चांगला व माणुसकी असणारा माणूस अशी त्यांची गावात ओळख होती. “मराठयाची अवलाद आहे मरणाला भीत नाही. आपलं सर्वस्व ही सह्याद्रीच असून तिच्याच कुशीत आपण शेवटचा श्वास घेणार आहोत.” असे ते नेहमी म्हणत असतं. सह्याद्रीच्या पुत्राच्या अशा दुर्दैवी मृत्यूने नक्कीच सह्याद्री देखील हळहळला असणार आहे.

शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ऊस दर श्रीगोंदा तालुक्यात एक नंबर राहणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *