मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) करोडो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. दाक्षिणात्य सिने-निर्माता अल्लू अरविंदचा ‘रामायण’ हा सिनेमा पुन्हा एकचा सध्या चर्चेत आलाय. या चित्रपटाची घोषणा २०१९ साली करण्यात आली होती.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटामध्ये कलाकारअसणार याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. यामध्येच आता दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्ल्वी या या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! पोलीस बंदोबस्त असून चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याने ११ पोलीस कर्मचारी निलंबित
‘रामायण’ या चित्रपटात साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. अजून या चित्रपटाच्या स्टारकास्ट संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मागच्या अनेक दिवसांपासून या चित्रपटावर काम चालू आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
चार पाय आणि चार हात असणाऱ्या मुलाचा ‘या’ ठिकाणी जन्म! सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल