Saif Ali Khan । मोठी बातमी! अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

Saif Ali Khan

Saif Ali Khan । बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात चोराने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून, त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर सर्जरी सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

Valmik Karad । वाल्मिक कराडच्या समर्थकाने पेटवून घेतल अंगाला आग, पाय जळाले; परळीतील आंदोलनात तणाव वाढला

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला मध्यरात्री 3 वाजता घडला. सैफ घरात कुटुंबीयांसोबत झोपला असताना चोर घरात शिरला. घरातील नोकरांनी चोराला पाहिल्यावर आरडाओरडा केला, ज्यामुळे सैफ जागा झाला. त्यानंतर सैफने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु दोघांमध्ये झालेल्या झटापटीत चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर घरातील इतर सदस्य आणि नोकरांनी सैफला रुग्णालयात नेले.

Takkal Virus in Buldhana News । बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा प्रकोप वाढला, ICMR चेन्नई पथक करणार तपास

वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, एफआयआर नोंदवण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथकं तयार केली आहेत. याप्रकरणी सैफच्या घरात काम करणाऱ्या तीन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासले जात आहेत.

Maha Kumbh Mela 2025 । महाकुंभ 2025 चे शुभारंभ, पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी

Spread the love