Saif Ali Khan । धक्कादायक! सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर

Saif Ali Khan

Saif Ali Khan । बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये आरोपी पूर्णपणे चेहरा झाकलेला दिसतो. आरोपीने सैफच्या इमारतीत एन्ट्री घेतल्यानंतर लिफ्ट न वापरता पायऱ्यांद्वारे घरात प्रवेश केला. पायऱ्यांवरून जात असतानाचा हा सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आले आहे, ज्यात आरोपीच्या पाठीवर काळ्या रंगाची सॅक दिसते आणि चेहऱ्यावर लाल रंगाचा मोठा रूमाल बांधलेला आहे.

Valmik Karad । वाल्मिक कराडच्या समर्थकाने पेटवून घेतल अंगाला आग, पाय जळाले; परळीतील आंदोलनात तणाव वाढला

गुरूवारी रात्री 1:37 वाजता आरोपीने सैफच्या घरात प्रवेश केला, आणि 2:33 वाजता त्याच पायऱ्यांवरून इमारतीच्या बाहेर पळ काढताना तो दिसला. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधी पोलिसांना आरोपीचे एक अन्य फुटेज मिळाले होते, ज्यामध्ये आरोपीचा फोटो शेअर करण्यात आला होता.

Takkal Virus in Buldhana News । बुलढाण्यात टक्कल व्हायरसचा प्रकोप वाढला, ICMR चेन्नई पथक करणार तपास

गुरूवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास आरोपीने सैफ अली खानवर चाकू हल्ला केला. हल्ल्यात सैफच्या शरीरावर दोन जखमा झाल्या होत्या, तसेच त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया केली गेली, आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

Maha Kumbh Mela 2025 । महाकुंभ 2025 चे शुभारंभ, पहिल्या शाही स्नानासाठी भाविकांची गर्दी

पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.

Gurucharan Health Update । तारक मेहताच्या सोढीची प्रकृती गंभीर, 19 दिवसांपासून अन्नपाणी सोडले

Spread the love