Sairaj Kendre । मागच्या काही दिवसापासून सोशल मीडियावर साईराज केंद्रे हा चिमुकला खूप चर्चेत आहे. सगळीकडे याच चिमुकल्याची चर्चा होताना दिसत आहे. आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर चिमुकल्याने भन्नाट एक्सप्रेशन दिले आहेत. त्यामुळे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा चिमुकला रातोरात स्टार झाला आहे. सध्या बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, आमच्या पप्पांनी गणपती आणला गाणं हे साईराजने गायलं आहे मात्र तसं नाही हे गाणं तर दुसऱ्याच दोन मुलांनी गायल आहे. (Sairaj Kendre)
Asia Cup 2023 । आशिया स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला ICC चा आणखी एक मोठा धक्का
आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावर साईराजने फक्त लिप्सिंग केली. मात्र या गाण्याचे गायक दुसरी दोन मुलं आहेत. या गाण्याचे मूळ गायक हे माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे ही दोन भावंडे आहेत. या दोन भावंडांनी गेल्या वर्षीच हे गाणं गायलं होतं. मात्र ज्यावेळी साईराजने या गाण्यावर इंस्टाग्राम रिल्स व्हिडिओ पोस्ट केला त्यावेळी हे गाणं पुन्हा चर्चेत आले आहे.
Arjun Kapoor । अर्जुन कपूरवर कोसळला दुःखाचा डोंगर! कुटुंबातील जवळच्या सदस्याने घेतला अखेरचा श्वास
या गाण्यामुळे साईराजला अगदी रातोरात चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचा हा व्हिडिओ कोट्यावधी लोकांनी पाहिला असून अनेक जणांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक देखील केले जात आहे. अनेक कार्यक्रमांना साईराजला आता बोलावले जात आहे. त्याचबरोबर सध्या त्याच गणपती बाप्पाच देखील गाणे येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Crime । मैत्रीच्या नात्याला काळिमा! डॉक्टर -डॉक्टर खेळू असे सांगितले आणि…