
मुंबई : मागच्या बऱ्याच दिवसांपासून सैराट फेम सुरज पवार (Suraj Pawar) अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील फसवणुक प्रकरणामुळे चर्चेत आहे. सुरजवर शिर्डीतील एका व्यक्तीला मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन फसवल्याचा आणि पैसे उकळल्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर सुरजने भाष्य केलं आहे. त्याची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
मोठी बातमी! ठाण्यातील अवजड वाहतूक उद्यापासून बंद
सुरजची फेसबुक पोस्ट –
नमस्कार मी सुरज पवार, गेली दहा पंधरा दिवसात माझी एवढी मानहानी झाली. किंवा केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सगळ्याच मिडीयांनी माझे एवढे धिंडवडे काढले. तरी पण मी शांत होतो. अखेर मी स्वत: राहूरी पोलीस स्टेशनला हजर झालो. पोलीसांसमोर सर्व कागदपत्रासह माझे म्हणने नमूद केले. त्यानंतर वेळोवेळी राहूरी पोलीस सांगेल त्या दिवशी हजर राहात होतो. पोलीस स्टेशनला पहील्यांदा हजर राहीलो आणि बाहेर मिडीयात ‘प्रिन्सला पोलीसांनी केली अटक ! प्रिन्स खाणार जेलची हवा ! प्रिन्स अखेर जेरबंद ! या अशा मधळ्याच्या बातम्या देवून प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने, कुठलीही शहानिशा करता माझ्या नावाने महाराष्ट्रभर रान पेटवलं. खरे पहाता राहूरी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत आणि त्यानंतर दाखल झालेल्या असंख्य तक्रारीत तक्रारदारांनी मला फक्त चित्रपटात काम करताना पाहीलं होतं. परंतू प्रत्येक्षात ते मला कधीच भेटले नव्हते. राहूरी पोलीस स्टेशनच्या अधिका-यानी अखेर सर्व तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलवून त्याची खात्री करून घेतली. तर एकाही तक्रारदारची माझ्या बाबत तक्रार नव्हती. आरोपींनी बचाव हेतून ठेवून माझे नाव घेतले होते हे पोलीसांसमोर सिध्द झालं. पोलीस अधिकारी श्री. दराडे साो आणि श्री. सज्जनकूमार न-र्हेडा आणि पोलीस टिमने सर्व सत्यता पडताळली आणि अखेर माझ्यावर लागलेलं “किटाळ” एकदाचं संपलं.
पण यामध्ये झालेली मानहानी हे नुकसान कधी भरून येणारं आहे. माझ्या जवळच्या लोकांचा माझ्यावरील विश्वास या प्रकरणातून उडाला. असंख्य जवळची माणसे आणि नाती माझ्यापासून दुर गेली. पाच महिन्यापूर्वी माझे लग्न झाले अशा आलेल्या बालंटा नंतर माझ्या पत्नी व तिच्या घरच्यांची परिस्थिती न सांगीतलेली बरी. या प्रकरणा नंतर सुखाच्या काळात माझ्या सोबत मज्जा मस्ती करणारे एकही मित्र या पडत्या काळात मदतीला धावली नाही. पण काही जवळचे चार लोकांनी मला धिर देवून या संकटात मदत केली त्यांचा शत:शहा ॠणी आहे..! #माझ्यावर आलेल्या संकटात प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने भरभरून जनतेसमोर सादर केलं पण या प्रकरणातून सहीसलामत सुटल्यानंतर त्याची कुठल्यातरी प्रिंट आणि डिजीटल मिडीयाने, चार ओळीची नोंद सुध्दा घेतली नाही..! सुरज पवार, पोपळज ता. करमाळा जि. सोलापूर
सणासुदीच्या मुहूर्तावर ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फुल शेतीचं पावसामुळं नुकसान