भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणून अंबानी कुटुंब ओळखले जाते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ( Anant Ambani) याचा साखरपुडा नुकताच पार पडला. राजस्थान येथील आलिशान हॉटेल मध्ये राधिका मर्चेंटसोबत ( Radhika Marchent) अनंतचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर आता पुन्हा एकदा या दोघांच्या दुसऱ्या साखरपुड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हौसेला मोल नाही, मुलाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाने उधळले लाखो रुपये
अंबानी कुटुंबियांच्या या साखरपुडा कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. मात्र यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची लेक आराध्य यांचीच सध्या चर्चा सुरु आहे. या साखरपुडा कार्यक्रमामध्ये चाहत्यानं तिचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. त्यामुळे सध्या तिची चर्चा चालू आहे.
शिवजयंतीपूर्वी हे सरकार कोसळणार – अमोल मिटकरी
तिचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘छोटी परी एवढी मोठी कधी झाली’. दरम्यान, मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला आहे. गोल धना आणि चुनरी विधी या परंपरेप्रमाणे दोघांचा साखरपुडा झाला.
राज्यसेवा मुख्यपरीक्षेत धक्कादायक प्रकार! परीक्षेवेळी ब्लूटूथचा वापर करणाऱ्या उमेदवारावर गुन्हा दाखल